• +91 7966324870, +91 7966324861
 • info@inshodh.org
 • Language :


Survey Guide Line

Home / Survey Guide Line

एज्युकेशन इंनोवेशन बेंक, आर.जे.एम.सी.इ.आय, आय.आय.एम अहमदाबाद: ओनलाईन शिक्षक समुदाय सर्वे

नमस्कार! एज्युकेशनल इंनोवेशन बेंक (EI Bank) ही आय.आय.एम अहमदाबादच्या (IIMA) रवी जे मथाई सेंटर फॉर एडुकेशन इनोवेशन्स (RJMCEI) ची परियोजना आहे. EI बेंक GCERT आणी SCERT(महाराष्ट्र) च्या मदतीने शिक्षणात सुधार करणाऱ्या नवीन उपक्रमांचे , शिक्षण क्षेत्रातील नवीन विचारांचे प्रोत्साहन करते.

गेल्या तीन वर्षांपासून EI बेंकने मोबाईल फोन च्या माध्यमातून भाग घेता येईल असा एक चर्चा मंच तैयार केला आहे, ज्याच्यात अंदाजे 10,000 सरकारी प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. ह्या माध्यमातून बऱ्याच शिक्षकांना स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा डेटाबेस निर्माण करावयास मदद झाली आहे. त्याचसोबत राज्यातील स कारी प्राथमिक शिक्षकांनी विविध उद्देश्यांच्या आणि विचारांच्या आदान प्रदानासाठी तंत्रज्ञान आधारित गट बनवले आहेत. पुष्कळ शिक्षकांनी ह्या चर्चा मंचातुन मिळालेल्या माहितीचा उपयोग केला आहे. ह्या शिवाय दुसऱ्या व्यक्तिगत शिक्षकांनी किंवा शिक्षकांच्या समूहांनी सुरु केलेल्या मंचांवर देखील अनेक शिक्षक सक्रीय आहेत.

ह्या पुढाकारांना समजण्यासाठी आम्ही गुजरात आणि महाराष्ट्रातील सरकारी शाळेतील शिक्षकांच्या इंटरनेट-आधारित समुदायांचा अभ्यास करीत आहोत. हे समुदाय फेसबुक (उदा. टीचर इंनोवेशन सारखे ग्रुप); शिक्षकांच्या व्हाट्सएप समूह (स्वतःच्या शाळेतील शिक्षकांसह, किंवा आपल्या क्लस्टर, ब्लॉक, जिल्हा किंवा राज्यातील अन्य शाळेतील शिक्षकांसह), शिक्षकांनी चालविलेले YouTube चॅनेल, मोबाइल एप्लिकेशन्स, वेबसाइट्स, किंवा ब्लॉग इ. या माध्यमांवर आधारित असू शकतात.

सर्वेक्षणानंतर

आम्ही ईमेल द्वारे आमच्या शोधी आपल्याशी सामायिक करू.

या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे

 • हे सर्वेक्षण फॉर्म www.inshodh.org वेबसाइटवर पोस्ट केले आहे. मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉप आणि कॉम्प्यूटरसह कोणत्याही गॅझेटवर इंटरनेटच्या सहाय्याने हे ऍक्सेस करता येते.

 • आपल्या अनुभवांवर आधारित प्रतिसाद/उत्तर भरा.
 • आपण आपल्यास उपलब्ध असलेल्या कोणत्याही फॉन्टमध्ये आपला अभिप्राय टाईप करू शकता (गुजराती, मराठी, हिंदी), किंवा आपण आपल्या भाषेत टाईप करण्यासाठी इंग्रजी फॉन्ट वापरू शकता.

 • प्रश्नांचे प्रतिसाद खालीलप्रमाणे तीन स्वरूपात असू शकतात:
  1. प्रश्न जेथे आपण केवळ एक पर्याय क्लिक करू शकता
  2. प्रश्न जेथे आपण एकाधिक पर्याय क्लिक करू शकता
  3. प्रश्न जेथे आपण प्रतिसाद टाइप करु शकता
 • प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी कृपया काळजीपूर्वक सूचना वाचा.
 • हे एक ऑनलाइन सर्वेक्षण आहे, जे आपण 15-20 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात सक्षम व्हायला हवे.

गोपनीयता

आम्ही आपल्याला आश्वासन देतो की सर्वेक्षण प्रश्नांवरील आपले सर्व प्रतिसाद गोपनीय राहतील आणि या प्रकल्पात समाविष्ट असलेल्या शोध गटाबाहेरील कोणासही सामायिक केले जाणार नाही. आमच्या रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आम्ही या सर्वेक्षणातील कोणत्याही व्यक्तिगत नावांची किंवा अन्य ओळख देणार नाही.